आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjabi Traditional Dance Bhangada In Marathi Literary Meet

घुमान साहित्य संमेलनः भांगड्याच्या रुपाने पंजाबी लोककलेचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी आणि पंजाबी समुदायामधील असलेले नाते अधिक समृद्ध व्हावे या दृष्टीकोनातून घुमानमध्ये साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्याच उद्देशाने मराठी बांधवांना पंजाबच्या संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी शनिवारी दुपारी खास पंजाबच्या लोककलेचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
मुख्य सभामंडपाच्या बाजुलाच तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर पंजाबी लोककलावंतांनी मराठी समुदायातील बांधवांसमोर सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण केले. विविध पारंपरिक पंजाबी वाद्यांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच खास भांगडा आणि पंजाबी लोकनृत्याच्या माध्यमातूनही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पुढील स्लाईडवर बघा, पंजाबी लोककलेचे दर्शन घडवणारा भांगडा नृत्यप्रकार...