आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjabi Traditional Dance Bhangada In Marathi Literary Meet News In Marathi

महाराष्ट्र रांगडा- पंजाबी भांगडा कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाले साहित्य रसिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान- 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (शनिवारी) अखेरचा दिवस. सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. गेल्या तीन दिवसांत घुमानमध्ये मराठीचा जागर सुरु होता. साहित्यप्रेमी कवी संमेलने, मुलाखती, आणि ग्रंथ प्रदर्शन तसेच मराठा रांगडा आणि पंजाबी भांगडा या कार्यक्रमांने साहित्य रसिक मंत्रमुग्ध झाले.

मराठीसह पंजाबी संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने शनिवारी सायंकाळी खास 'महाराष्ट्र रांगडा पंजाबी भांगडा' हा कार्यक्रम झाला. यावेळी शर्वरी जेमेनीस, स्मिता तांबे, भार्गवी चिरमुले, अश्विनी एकबोटे, त्यागराज खाडीलकर, अबधूत गुप्ते, फय्याज, यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी सादरीकरण केले. त्याचप्रमाणे पंजाबच्या लोककलेचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.
पुढील स्लाईडवर बघा, 'मराठी रांगडा - पंजाबी भांगडा' कार्यक्रमाचे Exclusive फोटो....