आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : संत नामदेवांच्या जन्मस्थळाबद्दल वंशजांनी केला नवा दावा, नरसी बामणी नाही जन्मगाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेव नगरी, घुमान (पंजाब) - पंढरपुरातील नामदेव महाराजांच्या मंदिरासाठी राज्य सरकारकडून काहीही मदत मिळत नसल्याची खंत नामदेव महाराजांचे 16वे वंशज कृष्णदास महाराज नामदास यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नामदेव महाराजांचा जन्म नरसी बामणी येथे नव्हे तर पंढरपुरातच झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केवळ नामदेवांच्या नावाने विकास व्हावा आणि निधी लाटता यावा यासाठी त्यांचा जन्म नरसी येथे झाल्याचे पसरवले जात असल्याचे कृष्णदास महराज म्हणाले.

कृष्णदास महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसी बामणी येथे नामदेव महाराजांचे पूर्वज राहत होते. कृष्णदास महाराज म्हणाले, ' नामदेव महाराजांच्या पाच पिढ्या तेथे राहिल्या. पण नामदेव महाराजांचे वडील बाळू शेटे यांच्या पत्नी आऊबाईला मुलगा होत नसल्याने पंढरपुरात विठुरायाला साकडं घालण्यासाठी आले. त्यानंतर पंढरपुरातच नामदेव महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांचे आई वडीलही पंढरपुरातच स्थायिक झाले.'
कृष्णदास महाराज यांनी सांगितले, की कार्तिक शुद्ध एकादशीला 1192 साली नामदेव महाराजांचा जन्म पंढरपुरात झाला. मानव कल्याणाचे कार्य केल्यानंतर ते 57-58 व्या वर्षी घुमानला आले. घुमानला त्यांचा पहिला शिष्य भवरदास हा होता. नामदेव महाराज घुमते घुमते आए... त्यामुळे या भागाला घुमान असे नाव पडले, असे त्यांनी सांगितले. नामदेव महाराजांचे कार्य 12 व्या शतकातील आहे, तर गुरू नानकदेव यांचे कार्य 14 व्या शतकातील आहे. त्यामुळे नानकदेव यांनी नामदेव महाराजांना गुरूस्थानी मानले होते, असे कृष्णदास महाराज सांगतात. नामदेव महाराज ज्या प्रदेशात जात आधी त्याठिकाणची भाषा शिकत. त्यामुळे त्यांनी पंजाबी भाषा शिकली आणि त्यांच्या पंजाबी रचनांना गुरूग्रंथसाहेबमध्ये मानाचे स्थान मिळाले.
कृष्णदास महाराज यांची घुमानची ही काही पहिली वारी नाही, ते येथे नेहमी येत असतात. नामदेवांचे वंशज असल्याने त्यांचा याठिकाणी मोठा आदर सत्कारही केला जातो, असे त्यांनी सांगितले.
विकासासाठी निधी मिळत नाही
वंशपरंपरेनुसार पंढरपुरातील नामदेव महाराजांच्या मंदिराची पुजा-अर्चना आणि देखभाल कृष्णदास महाराज यांच्याकडे आहे. पण त्यासाठी सरकारकडून कोणताही निधी मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पुणे रेल्वे स्थानकावर झाले कृष्णदास महाराजांचे स्वागत