आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय मंत्र्यांनी महिला पत्रकाराला विचारले, तुमच्यावर कधी बलात्कार झाला का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुठे चालत्या बसमध्ये तर, कधी सुरक्षित समजल्या जाणा-या घरातच महिला बलात्काराच्या शिकार होत आहेत. या शोषणाविरुद्ध जगभरातील महिला आज 'वन बिलिअन रायजिंग' द्वारे आवाज बुलंद करीत आहेत. अशातच एका केंद्रीय मंत्र्याने महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचविणारे वक्तव्य केले आहे.

एका पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने केंद्रीय मंत्री वायलर रवी यांना सुर्यनेल्ली कांडाबद्दल (यात राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्यावरही आरोप आहे.) प्रश्न विचारला. तर मंत्री महोदयांनी सरळ उत्तर देण्याएवजी त्या महिलेला सर्वांसमोर लज्जीत करणारे प्रश्न विचारले. वायलर रवी त्यांना म्हणाले, तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का? जसे सुर्यनेल्ली बलात्कार कांडात त्या पीडित महिले सोबत झाले? कुरियन यांच्यावर तुमचा काही वैयक्तिक राग आहे का?

केंद्रीय मंत्र्यांची ही टिप्पणी अत्यंत संतापजनक असल्याचे महिला संघटनांनी म्हटले आहे. केरळमध्ये महिला पत्रकारांनी कोची प्रेसक्लब समोर निदर्शने केली. सगळीकडून टीका झाल्यानंतर वायलर रवी यांनी माफी मागितली आहे.

'वन बिलिअन रायजिंग' आंदोलनाबद्दल जाणून घेण्यासाठी फोटोवर क्लिक करा.