आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : भाजपचे योगगुरु रामदेवबाबांपुढे 'लोटांगण', केजरीवाल भूमिकेवर ठाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रविवारी अण्णा हजारेंसोबत जंतर-मंतरवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन योगगुरु रामदेव बाबांनी काळ्या धनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितिन गडकरी यांची भेट घेतली.
गडकर रामदेव बाबांच्या स्वागतासाठी कार्यालया बाहेरच येऊन उभे राहिले होते. यावेळी ते रामदेव बाबांच्या पायादेखील पडले. रामदेव बाबांच्या भेटीनंतर गडकरी म्हणाले, रामदेव बाबांचे आंदोलन राजकीय नाही. हा देशाचा प्रश्न आहे, आणि भाजपचा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. हे आंदोलन काँग्रेसविरोधी नसल्याचेही ते म्हणाले.
गडकरींशी झालेल्या चर्चेनंतर रामदेव बाबा म्हणाले, काळ्या धनाविरोधात सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी सोनिया गांधीचीही भेट घेणार आहे. त्यासाठी त्यांची वेळदेखील मागितली आहे. ४ जून ते ८ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशातील राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली जाणार आहे. ९ ऑगस्टपासून हे आंदोलन व्यापक होणार आहे. रामदेव बाबा लालू प्रसाद यादव, ए.बी.बर्धन, शरद यादव यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदावर ते म्हणाले, आमच्यात कोणताही वाद नाही. यापेक्षा जास्त काहीच सांगणार नाही.
याआधी सोमवारी मीडीयाशी बोलतांना केजरीवाल म्हणाले की, व्यासपीठावरुन कोणत्याही नेत्याचे नाव घेऊ नये असा काही प्रोटोकॉल नव्हता आणि, असेलही तर त्याची मला माहिती नव्हती. माझ्या भाषणादरम्यान मला एक चिठ्ठी देण्यात आली मात्र तो पर्यंत मी नावं घेतली होती. माझे मत आहे की, भ्रष्ट नेत्यांची नावे घेतल्याशिवाय भ्रष्टाचाराविरोधातील लढाई प्रभावी होणार नाही.
रविवारी जंतर-मंतरवर अरविंद केजरीवाल यांनी मुलायसिंह यादव, लालू प्रसाद यादव, ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नावे घेऊन, देशाच्या संसदेत असे लोक असतील तर न्यायाची अपेक्षा कशी करायची असे म्हटले होते. त्यानंतर भाषण करतांना रामदेव बाबांनी आजच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेण्याची आमची इच्छा नव्हती असे म्हटले. त्यानंतर केजरीवाल व्यासपीठ सोडून निघून गेले. त्यामुळे केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्यात मतभेदाची चर्चा सुरु झाली आहे.


रामदेव बाबा व टीम अण्णांत मतभेद; अरविंद केजरीवाल स्टेज सोडून गेले
PHOTOS: रामदेव बाबा आणि अण्‍णा हजारेंचे भ्रष्‍टाचार-काळ्यापैशाविरोधातील उपोषण
कमी खा; पाणी जास्त प्या - काँग्रेसचा रामदेव बाबांना खोचक सल्ला