आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • clouds exploded killed four in uttarkashi and hp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये ढगफुटी : 12 लोक वाहून गेले 53 जण बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तर आणि पूर्व भारतात पावसाने व पूराने थैमान घातले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यानंतर आता उत्तराखंड राज्यात निसर्गाने कोप सुरु केला आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटी होऊन १२ लोक पुरात वाहून गेले आहेत. तर ५३ जण बेपत्ता आहेत. स्वर्णघाट आणि संगमचट्टी भागात १२ लोक वाहून गेले. यात फायर ब्रिगेडचे तीन जवानांचा समावेश आहे.
अस्मीगंगा आणि भागीरथी नदीला पूर आला आहे. या भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच या परिसरातील लोकांना पूरग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५८ हा बंद आहे. उत्तरकाशीमध्ये वीज गायब असून, टेलिफोन लाइन बंद पडल्या आहेत.
वैज्ञानिकात संभ्रम: अपयशामुळे कृत्रिम पाऊस प्रकल्पाला ब्रेक