आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदीचे संकेत : IT सेक्टरमध्ये घटल्या २९ टक्के नोक-या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात आयटी सेक्टरमध्ये उपलब्ध नोक-यात मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश आयटी कंपन्या अनिश्चित आर्थिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी खर्चात कपातीचे धोरण स्वीकारताना दिसून येत आहे.
मायहायरिंगक्लब.कॉमचे सीईओ राजेशकुमार यांनी सांगितले की, मे २०१२ मध्ये एप्रिलच्या तुलनेत आयटी आणि आयटी सेक्टरशी संबंधित नोकरभरतीत २९ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र बिगर आयटी क्षेत्रात नोक-या उपलब्धतेत एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात १३-१४ टक्के वाढ झाली आहे.
आयटी सेक्टरमधील नोक-यामधील शक्यतेबाबत सॅट-एन-मर्क मॅनपॉवर कन्सलटेंट संचालक प्राचीकुमार यांनी सांगितले की, आयटीत नोक-या सध्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तरीही काही स्किल्सच्या नोक-या बाजारात उपलब्ध आहेत. खर्चात कपात करणे आणि प्रोजेक्ट आऊटसोर्स करण्याचे प्रमाण वाढल्याने नोक-या उपलब्धतेत घट झाली आहे. प्राचीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक स्थितीसह राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्याने आयटी उद्योगावर परिणाम झाला आहे. मात्र पुढील काही महिन्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.
कोट्यवधींची क्रयशक्ती नापास, म्हणून मंदी पास