आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव, सेक्स, मर्डर : बेंगळुरु बनले किलर सिटी, ५ महिन्यात ३८ महिलांच्या हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरु- आयटी सिटी बेंगळुरु शहर सध्या किलर सिटी बनल्याचे चित्र आहे. बेंगळुरु शहरात गेल्या पाच महिन्यात ३८ महिलांच्या हत्या झाल्या आहेत. बेंगळुरु शहरात झालेल्या हत्येच्या घटना धक्कादायक आहेत पण देशातील आकडेही तेवढेच धक्कादायक आहेत. कारण नॅशनल क्राईम रिकॉर्डच्या ताज्या अहवालानुसार सन २०१० मध्ये देशभर ३३ हजार ३३५ हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत.
सिटी क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, बेंगळुरु शहरात मागील काही दिवसापासून महिलांना टारगेट केले जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, ८९ टक्के साक्षर असलेल्या या शहराची ओळख एक विकसित शहर अशीच आहे. कारण येथे वर्षाला दहा लाख रुपयांपेक्षा पैसे कमविणा-यांची संख्या खूप मोठी आहे. असे असले तरी येथील गुन्हेगारी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच चकचकीत व चमकणा-या शहरात काळ्या घटना वाढीस लागल्या आहेत.
बेंगळुरु शहरात झालेल्या हत्येवरुन लक्षात येते की यातील बहुतांश हत्या या जुन्या वादातून किंवा दुश्मनीतून झाल्या आहेत. याची कारणे प्रेमात धोका, प्रेम झिडकारणे, अनैतिक संबंध ठेवणे, जोडीदारावर संशय घेणे इत्यादी आहेत.
जानेवारी ते मेपर्यंत बेंगळुरुमध्ये हत्या झालेल्या ३८ महिलांपैकी २९ जणांनी आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन व कौटुंबिक वादातून हत्या केली आहे. ३८ महिलांपैकी १० जणींचे गळा दाबून खून केला आहे. दोन महिलांवर रेप करुन नंतर मारुन टाकले आहे.
का होताहेत हत्या-
आधुनिक राहणे ठरतेय शाप- गेल्या काही वर्षात बेंगळुरु शहराचे मापदंड बदलले आहेत. या शहरात मोठी तेजी आहे. येथे नोक-या, व्यवसाय चांगल्या रीतीने चालतात. त्यामुळे सर्वांकडे पैसा खुळखुळतो. याचा राहणीमानावर चांगलाच फरक पडत आहे. चांगले व उच्चाब्रु कपडे घालणे, अंगप्रदर्शन करणे, दंग कपडे घालून समोरच्याला उत्तेजित होईल असे राहणीमान ठेवणे, पश्चिमी संस्कृती स्विकारणे, देशभरातून बॅचलर मुला-मुलींचे वाढते प्रमाण व येणारा बक्कळ पैसा व वीक इंडला सतावणारा एकटेपणा यासारख्या घटनेतून हे गुन्हे, घटना वाढीस लागल्या आहेत.
मुलींची विचारशैली कारणीभूत- बेंदळुरुमध्ये राहणा-या मुली बॅचलर असतात किंवा लग्न झालेल्या असतात. त्यांच्याकडे उत्तम पैसा आहे व चांगले शिक्षण आहे. त्यामुळे विचाराने त्या मॉडर्न आहेत. शिवाय स्वत कमावत्या असल्याने पुरुषांना आम्ही कुठेही कमी नाही हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या मुलींचा त्यामुळे आत्मविश्वास प्रंचड उंचावलेला आहे. त्यामुळे मुली आपला जोडीदार निवडताना आपल्यापेक्षा अधिक वरचढ व सामाजिकदृष्या उच्च पाहिजे असा हट्टाहास करतात. तर दुसरीकडे मुले कितीही शिक्षलेली व कितीही पैसे कमावत असली तरी त्यांना घरात बायको म्हणून शांत व सती सावित्रीच लागते. त्यामुळे मुली लग्नानंतर साहजिकच आपल्या नव-याच्या कोंडमारीत सापडतात व तेथूनच वाद-विवाद सुरु होतात. त्याचेच परिणाम मर्डरसारख्या घटनेत बदलतात.
बेंगळुरुमध्ये देशात सर्वाधिक ४ हजार छोट्या-मोठ्या आयटी कंपनी आहेत. या शहराला सुमारे एक तृतीआंश महसूल या आयटी क्षेत्रातून मिळतो. याशिवाय भारतातील ३२० बायोटेक्नॉलाजी कंपन्यांपैकी १५८ कंपन्या एकट्या बेंगळुरुमध्ये आहेत. दहा लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाराही वर्ग येथे मोठा आहे.
दिल्लीत नृत्यशिक्षकाने तीन मित्रांसह केला शिष्येवरच बलत्कार
दिल्लीत बलात्‍कार करून महिलेची जाळून हत्या
मर्डर मिस्ट्री तयार करताना करण कक्कडचाच झाला मर्डर