आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग सात वर्ष धमकावत वकिलाने केला बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वालौर- मध्यप्रदेशमधील बहोडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला सलग सात वर्ष धमकावित वकिलाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत संबंधित महिलेने गुरुवारी बहोडापूर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण तलैया येथील रहिवाशी असलेल्या महिलेने पाचासा लाईन येथे राहत असलेल्या राहुल दुबे या वकिलावर आरोप केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, दुबे हा आपल्याला धमकावित असे व शरीरसंबंध ठेवत असे. माझ्या लग्न झाल्यानंतरही त्याने मला सोडले नाही. झाल्या प्रकाराची माहिती देऊन तुला बदनाम करीन अशी धमकी देत तो रोज माझ्यावर अत्याचार करायचा, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान राहुल दुबेला पोलिसांनी अटक केली आहे.