आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपात पुन्हा वाद : मोदींना आव्हान, नरेंद्र मोदी- संजय जोशी संघर्ष पेटणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक संजय जोशी यांच्या पोस्टरवरुन भाजपात रणकंदन माजण्याची शक्यता आहे.
गुजरातची राजधानी अहमदाबादमझ्ये लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांच्यावर पोस्टरद्वारे जोरदार प्रहार केल्याचे दिसून येत आहे. यात संजय जोशी यांचा फोटो लावण्यात आला असून भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव लिहण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये लिहले आहे की, 'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. कहो दिल से, संजय जोशी फिर से'. या संपूर्ण पोस्टरवर कोणाचेही नाव नाही. याबाबत बोलले जात आहे की, संजय जोशी यांच्या समर्थकांनी हो पोस्टर लावली असवीत.
संजय जोशी यांच्या समर्थनार्थ नवी दिल्ली येथे पोस्टर लावण्यात आली आहेत. या पोस्टरमधून भाजपावरही हल्ला चढविला आहे. एक पोस्टर नवी दिल्लीतील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयाजवळच लावण्यात आले होते. मात्र ते लगेच काढून टाकले आहे. आणखी एक पोस्टर भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या घराबाहेर लावण्यात आले आहे. यात रंगीत पोस्टरमध्ये जोशी यांचा फोटो लावण्यात आला आहे. यात म्हटले आहे दबावातून जोशी यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. मोदींना लक्ष्य करताना त्यात म्हटले आहे की, कोणाला तरी खूष करण्यासाठी दुस-या नेत्यांना दूर करणे योग्य नाही. तसेच या पोस्टरवर 'एक आदमी की दादागीरी नहीं चलेगी' असे लिहले आहे. आणखी एका पोस्टर लिहले आहे की, 'भाजपा की क्‍या मजबूरी, नहीं चलेगी दादागिरी', 'एक नेता को खुश करे, दूसरे नेता का इस्‍तीफा मांगे' 'क्‍या यही है भाजपा की नीति?'. दरम्यान भाजपने या प्रकारावर मूर्खपणा म्हणत कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
दरम्यान, या पोस्टरबाजीवर नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणताही प्रतिक्रिया आली नाही. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, मोदींना खालच्या स्तरावर दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र संजय जोशी यांना स्पष्ट केले आहे की, या पोस्टरशी माझे काहीही देणे-घेणे नाही. मी पोस्टर पाहिली नाहीत. तसेच ती कोणी लावली याबाबत कल्पना नाही. आपण कोणालाही पोस्टरबाजी करावे असे सांगितले नाही. काँग्रेसने हा भाजपमधील अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
इंदिरा गांधींनी खूप मोठे पाप केले होते- नरेंद्र मोदी
जोशी-मोदींमध्ये 22 वर्षांपासून वित्तुष्ट
जोशींचा राजीनामा घेतल्यानंतरच भाजपच्या बैठकीस मोदी हजर
पंतप्रधानांचे ईशान्य राज्यांकडे दुर्लक्ष: मोदी यांचे टीकास्‍त्र