आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलीलावरील कारवाईला रामदेवबाबांसह पोलिसही जबाबदार - सुप्रीम कोर्ट

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेले आणि त्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले राजबाला यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मृतांना दिल्या जाणा-या निधीपैकी २५ टक्के रक्कम ही रामदेवबाबा यांनी आणि ७५ टक्के दिल्ली पोलिसांनी द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.
रामदेवबाबा आणि त्यांच्या समर्थकांवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. मागील वर्षी जूनच्या सुरुवातीला रामदेवबाबा यांनी भ्रष्टाचार विरोधात आणि विदेशातील बँकामध्ये जमा केलेला देशातील काळा पैसा परत आणण्यात यावा, यासाठी उपोषण केले होते. रामलीला मैदानावर झालेल्या उपोषणावर दिल्ली पोलिसांनी मध्यरात्रीच्यावेळी कारवाई करीत ते उधळून लावले होते.
रामदेव बाबांनी रामलीला मैदानावर जमलेल्या आपल्या समर्थकांना ती जागा सोडून देण्याचे आवाहन करायला हवे होते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. रामदेव बाबा यांच्या स्वाभिमान ट्रस्टकडून मदतनिधीसाठीचे सव्वा लाख रुपये घेण्याचेही आदेश दिले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास अहवाल तीन महिन्यांत सादर करावा आणि आरोपींविरुद्ध कमला मार्केट ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. बी. एस. चौहान आणि न्या. स्वतंत्रकुमार यांनी गेल्या २० जानेवारी रोजी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता.
परवानगीशिवाय उपोषण करीत होते रामदेव बाबा
रामलीला मैदानावर योग शिबिरासाठी परवानगी घेण्यात आली होती; उपोषणासाठी नाही, असा खुलासा रामदेव बाबांचे माजी सल्लागार वेद प्रताप वैदीक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
रामलीला मैदानावर सकाळी योग शिबिर झाल्यानंतर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. त्याची पोलिसांना आणि सरकारला माहिती होती. पत्रकार परिषदांमधूनही रामदेव बाबांनी उपोषणाबद्दल वक्तव्ये केली होती. त्यामुळे सरकारला काहीच माहिती नव्हते, असे म्हणता येणार नाही, असे वेद प्रताप वैदीक यांनी सांगितले.
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?
रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं
रामदेव प्रकरण : दिशाभूल केली असेल तर सुप्रीम कोर्ट उगारणार कारवाईचा बडगा