आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनच्या शपथविधीला लाचखाऊ खासदार उपस्थित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी राज्यसभेत खासदारकीच्या पद व गोपनियतेची शपथ घेतली. मात्र या शपथविधी समारंभाला एक लाचखाऊ व भ्रष्टाचारी माजी खासदार प्रदीप गांधी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हामिद अन्सारी यांच्या कक्षात उपस्थित होते. रायपूरचे माजी खासदार असलेले गांधी हे भाजपचे नेते आहेत. मात्र २००५ मध्ये पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारणाच्या प्रकरणात ते सापडल्याने त्यांची खासदारकी रद्द केली होती.
असे असले ते महाशय माजी खासदार सचिनच्या शपथविधी कार्यक्रमात हजर कसे झाले असा प्रश्न विचारला जात आहे. शपथविधी सोहळ्याच्या वेळी हे महाशय फोटो काढून घेत होते. आता प्रश्न असा पडला आहे की, प्रदीप गांधी यांना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती अन्सारी यांच्या कक्षेत ते पोहचले कसे.?
PHOTOS : सचिनची नवी इनिंग : राज्यसभेत घेतली खासदारकीची शपथ
VIDEO : सचिन तेंडुलकर खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...
राज्यसभेत सचिन-रेखा