आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • team anna denied prmission for publiv meeting in haridwar

टीम अण्‍णांच्‍या सभेस परवानगी नाकारली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिद्वार- उत्तराखंडमधील निवडणुकीतून आपले भ्रष्‍टाचाराविरूद्धचे जन-जागरण आंदोलन टीम अण्‍णा शनिवारपासून हरिद्वार येथून सुरू करणार आहे. हरिद्वार येथील ऋषिकुल मैदानामध्‍ये त्‍यांची पहिली जाहीर सभा होणार होती. परंतु, प्रशासनाकडून त्‍यांना परवानगी नाकारण्‍यात आली आहे. त्‍यामुळे टीम अण्‍णांनी एका सभागृहामध्‍ये सभा घेण्‍याची तयारी केली आहे.

टीम अण्‍णांनी हरिद्वार येथील निवडणूक निर्णायक अधिका-याकडे सभेची परवानगी मागितली होती. पण त्‍यांना त्‍यासाठी परवानगी मिळाली नाही, असे टीम अण्‍णांचे सदस्‍य मनीष सिसोदिया यांनी सांगितले. प्रशासनाकडून मुद्दामहून यासंबंधी टाळाटाळ करण्‍यात आली, असा आरोप त्‍यांनी यावेळी केला.

हरिद्वार नंतर टीम अण्‍णा 22 तारखेला रूदप्रयाग, हल्‍दानी आणि 23 जानेवारीला श्रीनगर येथे सभा घेणार आहे. या सभांमध्‍ये अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनीष सिसोदिया, कुमार विश्‍वास आदी सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांतील भ्रष्‍टाचार विरोधी जनआंदोलनासाठी भारत विकास परिषद, शांतिकुंज, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि उलेमा परिषद देवबंदचे सहकार्य मिळत असल्‍याचे टीम अण्‍णांचे सदस्‍य कुमार विश्‍वास यांनी सांगितले.
अण्‍णा हजारे-रामदेव बाबा एकत्र, विधानसभा निवडणुकांमध्‍ये करणार प्रचार