आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती सेक्सच करीत नसल्याने व्याकुळ पत्नीची अखेर कोर्टात धाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील एका २६ वर्षीय महिलेने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात तिने आपल्याला पतीपासून शरीरसुख मिळत नाही. तो मानसिकदृष्ट्या नपुंसक असून लग्नाला अनेक महिने झाले तरी आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले नाहीत, असे पत्नीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
आपल्या पतीबरोबर वैवाहिक जीवन घालवणे यामुळे अशक्य झाले असून तो माझा मानसिक छळच करीत आहे. त्यामुळे माझी कुंचबणा होते. तसेच हे सिद्ध करण्यासाठी आपण वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तयार आहे.
महिलेच्या पतीने दिल्ली पोलिसात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, आमचे वैवाहिक आयुष्य ठीक चालले होते. तसेच आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपण जबाबदार नाही. मात्र पत्नीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नीने म्हटले आहे की, मी आणि पती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे हनीमून साजरा करण्यासाठी गेलो होतो. तेथे पतीचे असामान्य व्यवहार मला दिसून आले होते.
१५ दिवसाच्या हनीमूनच्या दरम्यान, आम्ही एकत्रच राहत होतो. पण आमच्यात एकदाही शरीरसंबंध झाले नाहीत. कारण पतीने साधे माझ्याजवळ येणेही पसंत केले नव्हते. मात्र त्याचदरम्यान तो अन्य एका महिलेबरोबर आरामपणे फिरत होता व राहत होता. या महिलेने आरोप केला आहे माझा पती सेक्स करण्यात मानसिकदृष्ट्या सक्षम नाही व त्यामुळेच मी आता त्याच्याबरोबर राहू शकत नाही.
नॅचरल ‍वायग्रा: डाळिंब ज्यूस सेवनाने वाढवा सेक्स पॉवर!