आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Crore Illegal Estate Got From Clerk In Bhopal

मध्‍य प्रदेशात लिपिकाकडे आढळली 10 कोटींची संपत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्‍य प्रदेशात आज भ्रष्‍टाचाराचे नवे प्रकरण समोर आले आहे. भोपाळमध्‍ये लोकायुक्‍तांच्‍या छाप्‍यामध्‍ये एका लिपिकाकडे सुमारे 10 कोटींची संपत्ती असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.

वीज विभागात लिपिक असलेल्‍या या व्‍यक्‍तीचा पगार हा 48 हजार रूपये इतका असून त्‍याच्‍याकडे 25 पेक्षा जास्‍त स्‍थावर मालमत्ता आहेत. यामध्‍ये 12 पेक्षा जास्‍त दुकाने आहेत. ही संपत्ती आपल्‍या मुलांनी कमावली असून आपण भ्रष्‍टाचाराने संपत्ती कमावली नसल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे.