आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Crore Indian Children Have Online Bostan Consulting Group

13 कोटी भारतीय मुले ऑनलाइन - बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - 2017 मध्ये देशातील 13 कोटी मुले ऑनलाइन नेटवर्किंगमध्ये असतील, अशी शक्यता बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन असलेल्या संख्येपेक्षा हा तिप्पट आकडा आहे.
बीसीजीच्या नव्या अभ्यासात 2017 पर्यंत भारतात 9 कोटी 50 लाख मुलेऑनलाइन राहतील. 2012 मध्ये देशातील 3 कोटी 90 लाख मुलेऑनलाइन होती. 2017 पर्यंत एकूणऑनलाइन मुलांची संख्या 13 कोटी 40 लाख असेल, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) म्हटले आहे. बीसीजीने युरोपियन टेलिकॉम कंपनी टेलिनॉरसाठी हा अभ्यास केला आहे.

भक्कम व्यवस्था हवी:ऑनलाइन तरुणांची वाढती संख्या व त्यातून उद्भवणा-या धोक्याबाबत जागृत करण्याबरोबरच दूरसंचारच्या दृष्टिकोनातून त्यावर उपाय शोधण्याचा कंपनीचा उद्देश होता. वर्तवणुकीत लवचिकता आणणे हाचऑनलाइन जगाला तोंड देण्याचा उपाय आहे. साधारण 1 कोटी 40 लाख मुलांचा घातकऑनलाइन कंटेंटशी संबंध येतो. तसेच 3 कोटी 50 लाख मुले सायबरवरील गैरकृत्याचा अनुभव घेतात.ऑनलाइन जगामध्ये मुलांना कोणताही धोका होऊ नये तसेच त्यातून त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यावर अभ्यासात भर देण्यात आला आहे.ऑनलाइन असतानाचे धोके टाळण्यासाठी कायदेशीर व्यवस्था आणखी बळकट असणे आवश्यक आहे, असे बीसीजीचे ग्लोबल लीडर नूट हानेस यांनी सांगितले.