आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत 17 भारतीयांची फाशीची शिक्षा माफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमृतसर - दुबईत पाकिस्तानी नागरिकाच्या हत्येप्रकरणी 17 भारतीयांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा गुरुवारी माफ करण्यात आली. त्यासाठी त्यांना 15 लाखांचा ब्लड मनी (हत्येच्या भरपाईपोटी दिली जाणारी रक्कम) रविवारपर्यंत जमा करावा लागणार आहे. ब्लडमनी म्हणून आठ कोटी रुपये याआधीच जमा करण्यात आले आहेत. हे सर्व 17 आरोपी पंजाबचे रहिवासी आहेत. पाकिस्तानी नागरिक मिश्री खान याची 2009 मध्ये हत्या केल्याप्रकरणी ते शारजाह येथे अटकेत आहेत. न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी त्यांनी आठ कोटींचा ब्लडमनी याआधीच भरला असून ही रक्कम मिश्री खानच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून देण्यात आली आहे.