आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- ही अशी केवळ तीनच नव्हे,कित्येक प्रकरणे आहेत. सर्वच आरोपींचे वय 18 पेक्षा कमी असते. यासंबंधीच्या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांतही अशांना केवळ 3 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. याचे कारण म्हणजे, हा कायदा शिक्षेऐवजी त्या व्यक्तीमध्ये सुधारणा व्हावी, यावर भर देतो. अल्पवयीन गुन्हेगारांना तुरुंगांऐवजी सुधारगृहांत पाठवले जाते. मात्र, खरीच परिस्थिती सुधारली आहे का? गेल्या दशकात अल्पवयीन गुन्हेगारांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणांत प्रचंड वाढ झाली आहे. 2000 मध्ये अल्पवयीन मुलांनी बलात्कार केलेल्या प्रकरणांची संख्या 198 होती. 2011 मध्ये ती 1149 झाली आहे.
राष्ट्री य गुन्हे नोंदी पाहता 10 वर्षांत अल्पवयीन गुन्हेगारांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणांत 170 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रकार वाढण्यामागे अल्पवयीन गुन्हेगारांना मिळणारी अल्प शिक्षा हे एक कारण आहे.
राष्ट्री य गुन्हे नोंदणी ब्युरोनुसार 65 टक्के अल्पवयीन गुन्हेगारांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांन्वये नोंद होऊ शकतील असे गुन्हे केले आहेत. अशा प्रकरणांतील गुन्हेगारांचे वय 16 ते 18 वर्षे होते. एवढेच नव्हे, सुधारगृहांमध्ये ठेवून या गुन्हेगारांत काय सुधारणा झाली हा पण एक वादाचा मुद्दा आहे. कारण, बालसुधारगृहात राहून बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हे केलेले यात 22 टक्के आरोपी आहेत.
राष्ट्री य सरासरीचा विचार करता दुस-यांदा गुन्हे करणारे अल्पवयीन गुन्हेगार 11 टक्क्यांहून अधिक आहेत.
विभक्त कुटुंब आणि पालक जवळ नसलेली मुले गुन्हेगारीत उतरतात असे म्हणणे एनसीआरबीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर खरे वाटत नाही. कारण, 2011 मध्ये अटक झालेल्या एकूण अल्पवयीन गुन्हेगारांपैकी केवळ 5.7 टक्के घरापासून दूर राहत होते. उर्वरित 81.3 टक्के पालक किंवा माता-पित्यांसमवेत राहत होते. एनसीआरबीच्या मते शिक्षण हा अशा गुन्हेगारीत महत्त्वाचा घटक ठरतो. याचा विचार करता, 57 टक्के प्रकरणांत गुन्हेगार गरीब कुटुंबातील होते. सुमारे 55 टक्के प्रकरणांत गुन्हेगार अशिक्षित किंवा केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.