आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये 19 कोटी जप्त; 36 लाख लिटर विदेशी दारूही पकडली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड: विधानसभा निवडणुकीच्या काळातील गैरव्यवहारास रोखण्यासाठी व काळा पैसा जप्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे रोख 19 कोटी रुपये जप्त करण्यात आले. दुसरीकडे 36 लाख मिली लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये आयकर विभाग, दक्षता विभागाच्या अधिकाºयांचाही समावेश होता. राज्यातील 27 जिल्ह्यांत काही ठिकाणी हेरॉइनसारखे अमली पदार्थदेखील आढळून आले आहेत. पंजाबमध्ये 24 डिसेंबर ते 11 जानेवारी या काळात ही कारवाई करण्यात आली होती. पंजाबमध्ये 30 जानेवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टीमला काही बेकायदा औषधीही आढळून आली.