आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामींचा युक्तिवाद पूर्ण , 4 फेब्रुवारीला होणार फैसला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधातील जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांचा युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. या प्रकरणात चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची त्यांची मागणी आहे. स्वामींचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी 4 फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवण्याचे जाहीर केले.
माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि पी. चिदंबरम यांनी संगनमताने हा गुन्हा केला आहे. राजा यांच्या सोबतीने चिदंबरम यांनी कट रचल्याचे स्वामी यांनी न्यायालयात सांगितले.
रचला आणि दोघांनी मिळून गुन्हा केला असे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे स्वामी यांनी न्यायालयास सांगितले. चिदंबरम यांचा हात असल्याचे पुरेसे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्पेक्ट्रमचे मूल्य निश्चित करण्याचा निर्णय चिदंबरम आणि राजा यांनी एकत्रितपणे घेतला होता. या प्रकरणाची खडा न खडा माहिती चिदंबरम यांना होती, असा आरोप स्वामी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये राजा यांना या प्रकरणात अटक झाली. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत, हे विशेष.