आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेघालयमध्‍ये बस दरीत कोसळून 22 जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिलॉंगः मेघालयमध्‍ये बस दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात 22 जणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याची घटना आज पहाटे घडली. ही बस त्रिपुरा येथे जात होती. मेघालय आणि आसामच्‍या सीमेजवळ चालकाचे नियंत्रण सुटुन बस दरीत कोसळली. दरी जवळपास 80 फुट खोल आहे. बसमध्‍ये जवळपास 40 प्रवासी होते. आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. पहाटे 3 ते 5 या वेळेत हा अपघात झाला. जखमींना जवळच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.