आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील 24 मुलांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्राला एकही नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरातील 24 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील मुलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मुलाचा समावेश नाही. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या आधी पंतप्रधान मनमोहन सिंग या मुलांचा गौरव करणार आहेत. 24 मुलांमध्ये 8 मुली व 16 मुलांचा समावेश
आहे. पाच मुलांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पुरस्कारप्राप्त मुलांच्या नावाची घोषणा केली.