आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2g scam patiala house court hearing on swamis petition

चिदंबरम यांच्‍यावरील खटल्‍याचा निर्णय चार फेब्रुवारीपर्यंत राखीव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गृहमंत्री पी. चिदंबरम यांना टू जी घोटाळ्यात सहआरोपी करण्‍याची मागणी करणा-या याचिकेवरील निर्णय दिल्‍लीच्‍या पटियाला हाऊस न्‍यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे. जनता पक्षाचे अध्‍यक्ष सुब्रह्मण्‍यम स्‍वामी यांनी ही याचिका दाखल केली होती.

सुब्रह्मण्‍यम स्‍वामी यांनी टू जी प्रकरणी पी. चिदंबरम यांच्‍या विरोधातील महत्‍वपूर्ण कागदपत्रे सात जानेवारी रोजी न्‍यायालयात जमा केले होते. अर्थमंत्री असताना पी. चिदंबरम यांनी तत्‍कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांच्‍याबरोबर स्‍वान टेलिकॉम आणि युनिटेक मोबाईल कंपनीला टू जी परवाना देण्‍यास मदत केली होती, असा आरोप सुब्रह्मण्‍यम स्‍वामी यांनी केला आहे. टू जी स्‍पेक्‍ट्रम घोटाळयात ए राजा इतकेच पी चिदंबरम देखील जबाबदार असल्‍याचे स्‍वामी यांनी गेल्‍यावर्षी न्‍यायालयाला सांगितले होते.
टू जी स्पेक्ट्रमप्रकरणी दिल्ली हायकोर्टाद्वारे सीबीआयला नोटीस