आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Held For Online Abuse Of Kashmir Girls Rock Band

काश्मिरी मुलींच्‍या रॉक बँडला धमकावणा-या तिघांना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर: काश्मिरमध्ये ‘प्रगाश’ या महिलांच्या रॉक बँडला सोशल नेटवर्किंग साईट्सवरून धमकी दिल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मिर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी 26 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काश्मिरमध्ये झालेल्या बॅटल ऑफ बँड या स्पर्धेत प्रसिद्ध झालेल्या प्रगाश रॉकबँडमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. गिटारिस्ट नोमा नजीर, अनिका खालिद आणि ड्रमर फराह दीबा या तीन मुलींनी अल्‍पावधीतच लोकप्रियता मिळाली होती. कट्टरवाद्यांच्या धमकीनंतर या बँडमधील मुलींना काही लोकांनी धमक्या दिल्याचे उघड झाले आहे.