आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍य वन संरक्षकाकडे आढळले 65 कोटी रूपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन- लिपिकाकडे 30 कोटींची अवैध मालमत्ता सापडल्‍याचे प्रकरण ताजे असतानाच मध्‍य प्रदेशमध्‍ये मुख्‍य वनसंरक्षकाकडे 65 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्‍याचे उजेडात आली आहे. उज्जैन येथील मुख्‍य वनसंरक्षक बी.के सिंग यांच्‍या घरी बुधवारी लोकायुक्‍तांनी टाकलेल्‍या छाप्‍यात ही कारवाई करण्‍यात आली. सिंग हे मूळचे उत्तर प्रदेशातील बनारस येथील आहेत.

आतापर्यंतच्‍या चौकशीत त्‍यांच्‍याकडे 65 कोटींची अवैध मालमत्ता असल्‍याचा खुलासा झाला आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे पहाटे पाच वाजताच लोकायुक्‍त टीम सिंग यांच्‍या विद्यापीठ रस्‍त्‍यावरील सरकारी निवासस्‍थानी पोहोचली.

सिंग यांच्‍याकडे आढळून आलेली संपत्ती पुढीलप्रमाणे-

सिहोर येथे 15 एकर जमीन, शामपुरा येथे 10 एकर, सिहोर रस्‍त्‍यावर 10 एकर, बुधनी येथे 28 एकर, उत्तर प्रदेशतील जौनपूर गावात 150 एकर जमीन आणि चार हजार चौरस फूटाचे आलीशान घर, बनारस येथील केंट भागात 10 हजार चौरस फुटाचे घर, याच घरापाठीमागे 80 हजार चौरस फुटाचे गार्डन मंगल कार्यालय, बनारसमध्‍ये भारत पेट्रोलियमचा पंप, तिथेच एक हॉटेल अजय, सुर्या हॉटेल, गौतम येथे पत्‍नी व सास-याच्‍या नावे 50 लाख रूपयांची गुंतवणूक संबंधीचे दस्‍तऐवज.

त्‍याचबरोबर 50 लाख रूपयांपेक्षा जास्‍तीचे मुदत ठेवीचे प्रमाणपत्र, सात लाख रूपये रोख, एक किलो सोने, एक किलो चांदी, एक रिव्‍हॉल्‍वर त्‍याची किंमत सुमारे दोन लाख रूपये. लोकायुक्‍त कार्यालयाने छापा टाकण्‍यासाठी दोन टीम बनवल्‍या होत्‍या. दुसरी टीम सिंग यांच्‍या भोपाळ येथील घरी कारवाई करण्‍यासाठी गेली.