आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Year Old Boy Was Forced Unnatural Sex In Ashiyana Home

दिल्‍लीत एचआयव्‍हीग्रस्‍त चिमुकल्‍यावर अनैसर्गिक अत्‍याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माले/नवी दिल्‍ली- बलात्‍कार आणि अनैसर्गिक कुकर्माच्‍या दोन खळबळजनक घटना उघडकीस आल्‍या आहेत. मालदीवमध्‍ये एका भारतीय शिक्षिकेवर सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला असून तिची प्रकृती गंभीर असल्‍याची माहिती आहे. तर दिल्‍लीत एका 7 वर्षांच्‍या एचआयव्‍ही पीडित चिमुकल्‍यावर अनैसर्गिक कुकर्म करण्‍यात आले. हा प्रकार दिल्‍ली सरकारच्‍या 'आशियाना होम'मध्‍ये घडल्‍याचे उघडकीस आले आहे. बेसहारा मुलांसाठी 'आशियाना होम'मध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येते.

दिल्‍लीतील पीडित चिमुकल्‍याच्‍या आईचे यापुर्वीच एड्समुळे निधन झाले आहे. तर त्‍याचा पिता स्‍वतःच्‍याच मुलीवर बलात्‍काराच्‍या आरोपाखाली तुरुंगात आहे. या मुलावर 'आशियाना होम'मधील मोठ्या मुलांनी अत्‍याचार केल्‍याची तक्रार करण्‍यात आली आहे. बालकल्‍याण समितीने पीडित मुलाला तेथुन हलविले आणि एका एनजीओच्‍या स्‍वाधिन केले. याप्रकरणाची माहिती एनजीओने 4 फेब्रुवारीलाच दिली होती. परंतु, समितीने आशियाना होमच्‍या अधिकारी आणि कर्मचा-यांवर कारवाई केलेली नाही. या प्रकरणी एफआयआर दाखल झाली नाही.

मुलावर 'चाईल्‍ड सर्वायव्‍हल इंडिया' नावाच्‍या एनजीओच्‍या देखरेखीखाली एचआयव्‍हीचा उपचार सुरु होता. याच संस्‍थेने हा प्रकार उघडकीस आणला. बालकल्‍याण समितीसमोर मुलाने कथन केलेला प्रकार ऐकून सर्वांना धक्‍काच बसला. याप्रकरणाची चौकशी करण्‍यात येत असून दोषींवर कारवाई करु, असे समितीच्‍या प्रमुख कमला लेखवानी यांनी सांगितले.