आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 70 Year Old Man Fulfills His Wishe At The Time Of His 50th Marriage Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या सत्तरीत वरमालेचा सोहळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलाना (हरियाणा)- हरियाणातील जिंद जिल्ह्यातील ब्राह्मणवास गावात नुकताच एक अनोखा सोहळा पार पडला. गावातील 70 वर्षांचे ओमप्रकाश आणि त्यांची पत्नी ओमपती यांची पन्नास वर्षांपासूनची इच्छा मोठय़ा थाटामाटात पूर्ण केली. 50 वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या वेळी सप्तपदी घालण्यात आली होती. मात्र वरमाला घालण्याची प्रथा नव्हती. तेव्हापासून परस्परांना वरमाला घालण्याची या दोघांचीही इच्छा अपूर्ण राहिली होती.
या दाम्पत्याची मुले राजवीर, सत्यवान आणि श्री भगवान तसेच नातवंडांनी त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 3 जूनला या सोहळ्याचे आयोजन केले आणि लग्नाच्या वाढदिवशी या दोघांनी परस्परांना वरमाला घातल्या. मोठय़ा उत्साहात हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर गावजेवणही देण्यात आले. ब्राह्मणवास गावचे सरपंच राधेश्याम शर्मा यांनी सांगितले की, अशा प्रकारचा सोहळा आमच्या गावात प्रथमच पार पडला आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढय़ा थाटामाटात सोहळा आयोजित केला, ही आनंदाची गोष्ट आहे. कित्येक वर्षांपासूनची मनातील इच्छा पूर्ण झाल्याबद्दल ओमप्रकाश आणि पत्नी ओमपती यांनाही आपल्या मुलांचा अत्यंत अभिमान वाटला.