आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 800 People Had Died In Stampede At Kumbh Mela 60 Years Ago

60 वर्षांपूर्वी कुंभ मेळ्यात याच ठिकाणी केले होते मृत्‍यूने भीषण तांडव...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभ मेळ्यात मौनी अमावस्‍येला अलाहाबाद येथे झालेल्‍या चेंगराचेगरीमध्‍ये 36 जणांचा मृत्‍यू झाला. याशिवाय 50 जणांना गंभीर अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. या घटनेने 60 वर्षांपूर्वी कुंभ मेळ्यात झालेल्‍या चेंगराचेंगरीच्‍या कटू स्‍मृतिंना उजाळा दिला. ही घटना 1954 मध्‍ये घडली होती. त्‍यात सुमारे 800 जणांचा मृत्‍यू झाला होता. तर 2000 जण जखमी झले होते.

कुंभ मेळ्यात मौनी अमावस्‍येला प्रचंड गर्दी होते. अशीच मौनी अमावस्‍या 3 फेब्रुवारी 1954 रोजी होती. प्राप्‍त माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला मध्‍यरात्रीनंतर गंगा नदीचे पाणी अचानक वाढले. त्रिवेणी संगमाजवळील आश्रमांमध्‍ये पाणी शिरू लागले. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

ही घटना घडली त्‍यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. त्‍या कुंभ मेळ्यात तेदेखील सहभागी झाले होते. घटनेनंतर त्‍यांनी न्‍या. कमलाकांत वर्मा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली चौकशी करण्‍यात आली होता. नेते आणि व्‍हीआयपींना स्‍नान पर्वांवर कुंभ मेळ्यात न जाण्‍याचे आवाहन त्‍यानंतर पं. नेहरुंनी केले होते. त्‍यानंतर कुंभ मेळ्यात अशी भीषण चेंगराचेगरी झाली नव्‍हती.

60 वर्षांपूर्वी घडलेल्‍या या घटनेची काही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा