आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माय एफएम’ला पाच गोल्डन अवॉर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- 94.3 माय एफएमने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाच गोल्डन अवॉर्ड जिंकले आहेत. मुंबईत झालेल्या एका समारंभात ‘माय एफएम’च्या एक रुपया अभियान व बॉर्डरलेस रेडिओला प्रमोशन व इफेक्टिव्हनेस र्शेणीत गोल्डन, चिंगम बॉयला इफेक्टिव्हनेस र्शेणीत रौप्य, इचगार्डची जाहिरात व बॉर्डरलेस रेडिओला क्रिएटिव्हिटी व इनोव्हेशन र्शेणीत कांस्य पुरस्कार देण्यात आला आहे. ‘माय एफएम’ला हे सर्व पुरस्कार ग्राहकांची पसंती व कसोटीला पात्र ठरल्याबद्दल मिळाल्या आहेत. या वर्षी गोल्डन माइक अवॉर्डसाठी जवळपास 400 प्रवेशिका आल्या होत्या. त्यात सर्वाधिक 10 र्शेणीतून माय एफएमला नामांकने देण्यात आली होती. ‘माय एफएम’चे सीईओ हरीश भाटिया यांनी सांगितले की, ‘हे सर्व पुरस्कार कठोर पर्शिमाचे फळ आहे.’ याआधी माय एफएमला एक्सिलेन्स इन रेडिओ अवॉर्ड पुरस्कारही मिळाला आहे. गेल्यावर्षी ‘माय एफएम’ने गोल्डन माइक समारंभात चार पुरस्कार जिंकले होते.