आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Blast Issue Timer Manufacturing In Gujarat

गुजरातमध्ये बनलेल्या \'टायमर्स\'ने बिहारमधील महाबोधी मंदिरात स्फोट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बिहारमधील महाबोधी मंदिर परिसरात गेल्या सात जुलैला झालेल्या स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा करण्‍यात आला आहे. स्फोटात वापरण्‍यात आलेले 'टायमर्स'ची (घड्याळ) निर्मिती गुजरातमध्ये झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्फोट घडवण्यापूर्वी दहशतवाद्यांनी ही टायमर्स गुवाहाटी येथून खरेदी केले होते.

सूत्रांनुसार, बुद्धगयामधील महाबोधी मंदिरात झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. स्फोटात वापरण्यात आलेले टायमर्स हे गुजरातमधील लोटस कंपनीच्या आहेत. राजकोट येथील प्रकल्पात या टायमर्सची निर्मिती झाल्याचेही एनआयएच्या अधिकार्‍यांनी सांगितले. स्फोट घडवण्यापूर्वी दहशतवाद्यांनी हे टायमर्स गुवाहाटी येथून खरेदी केले होते. उल्लेखनीय म्हणजे स्फोटकांसोबत जोडलेले गॅस सिलिंडर बिहारमधूनच खरेदी केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्फोटात स्थानिक नागरिकांचा हात असल्याचा संशय आणखी बळावला आहे. स्फोटात मंगोलियन चेहरा असलेल्या नागरिकांचा हात असल्याचीही शक्यता तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांनी बुद्धगया येथील महाबोधी मंद‍िर परिसरात एकूण 13 स्फोटके पेरली होती. त्यापैकी 10 स्फोटकांचा ब्लास्ट झाला होता. यात दोन बौद्ध भिख्कु जखमी झाले होते. त्यातील एक मान्यमार येथील तर दुसरा तिबेटमधील आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, 'बुद्धगया बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी 'एनआयए'कडून संशयिताचे रेखाचित्र जारी'