आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये फौजदार भरती: 2004 मध्ये अर्ज केला, 2016 मध्ये पळायला लावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर - बिहारमध्ये सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा विचित्र अनुभव येथील पदवीधरांना असून त्यामुळे सुमारे २३३ लोकांचे करिअर संपुष्टात आले आहे. राज्यातील अनेक तरुणांनी २००४ मध्ये फौजदार पदासाठी अर्ज केला होता; परंतु परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला व निकालाविरोधात काही तरुण न्यायालयात गेले. २०११ मध्ये न्यायालयाने या उमेदवारांची शारीरिक क्षमता व लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिले. काही परीक्षार्थींची परीक्षाही झाली; परंतु कोर्टात गेलेल्या लोकांना पाच वर्षे आणखी प्रतीक्षा करावी लागली. आता २०१६ मध्ये १२ वर्षांनी फौजदार पदासाठी २३३ उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीअंतर्गत पळायला लावले. बहुतांश उमेदवार चाळिशीच्या पुढे गेले होते. परिणाम व्हायचा तोच झाला. सगळेच उमेदवार नापास झाले. एक महिला उमेदवार पास झाली, कारण तिला धावण्याची चाचणी देण्याची आवश्यकता नव्हती.

आम्हाला नियुक्ती मिळावी असे सरकारला वाटत नाही : फौजदार पदासाठी लेखी परीक्षेतील घोळावरून न्यायालयात खटला लढवणारे बालू घाट येथील तरुण राजेश कुमार म्हणाले की, आम्हाला नियुक्ती मिळावी ही सरकारचीच इच्छा दिसत नाही. कारण न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ५ वर्षे आम्हाला पळवले जात आहे. तुम्ही कोणत्याही तज्ज्ञांना विचारा की, ४२ व्या वर्षी आता धावणे शक्य अाहे काय? आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.
अशी उलटली १२ वर्षे
२००४ मध्ये फौजदार भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली; परंतु काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशाने १५१० तरुणांच्या नेमणुका झाल्या. उर्वरित उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात आले. त्यांच्यापैकी २३३ जण २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेले. २०११ मध्ये न्यायालयाने त्यांची शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिले. सरकार व पोलिस प्रशासन पाच वर्षे ढिम्म राहिले. त्यामुळे आमचे नुकसान झाले. आता निकालाच्या सहा वर्षांनंतर २३३ उमेदवारांना चाचणी देण्यास बोलावण्यात आले.
चाळिशी ओलांडल्यानंतर शारीरिक क्षमता घटणे स्वाभाविक आहे. सातत्याने सराव केल्यानंतर तसेच व्यायामामुळे खेळाडू ३५ वर्षे वयापर्यंत फिट राहू शकतात. फौजदार पदासाठी अर्ज भरला त्या वेळी सर्व जण तंदुरुस्त असतील. कारण त्या वेळी ते ३५ वर्षांचे होते. आता ४० च्या पुढे आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या धावण्याच्या क्षमता चाचणीवर दिसून आला असावा
-पारस प्रसाद गुप्ता, शारीरिक क्षमता तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...