आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar MP Punjab Karnataka Bye Election News In Marathi

बिहार पोटनिवडणूकः लालू-नितिश-कॉंग्रेस आघाडीला 6 तर भाजपने 4 जागा जिंकल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- लालू प्रसाद यादव आणि नितिशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी आघाडीची घोषणा केली होती.)
नवी दिल्ली / पाटणा - बिहारमधील 10 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, नितिशकुमार यांचा जनता दल (यू) आणि कॉंग्रेस आघाडीने 6 जागा जिंकल्या असून भाजपच्या खात्यात 4 जागा पडल्या आहेत, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
चार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटक येथे झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातही बिहारच्या 10 जागांच्या निकालाची जास्त उत्सूकता लागली होती. आता आघाडीच्या पदरात 6 तर भाजपच्या खात्यात 4 जागा पडल्या आहेत. गेल्या निवडणुकीत या दहापैकी सहा जागा भाजपकडे होत्या.
मध्य प्रदेश विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजप विजयी झाला आहे. पंजाबमध्ये पटियाला विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार परनीत कौर 23 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. दुसऱ्या जागेवर शिरोमणी अकाली दलाचे जीत मोहिंदर सिंह निवडून आले आहेत. कर्नाटकात बल्लारी विधानसभेवर काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. इतर दोन जागांपैकी एका जागा कॉंग्रेसच्या तर दुसरी भाजपच्या खात्यात पडली आहे.
बिहार पोटनिवडणुकीचे निकाल
जागाउमेदवारपार्टी
नरकट‍ियागंजरश्‍मि वर्माबीजेपी
राजनगररामअवतार पासवानआरजेडी
जालेर‍िषी मिश्राजेडीयू
छपरारणधीर कुमार सिंहआरजेडी
हाजीपुरहाजीपुरबीजेपी
मोहद्दीनगरअजय कुमार बुलगेन‍िनआरजेडी
परबत्‍तारामानंद प्रसाद सिंहजेडीयू
भागलपुरअजीत शर्माकांग्रेस
बांकाराम नारायण मंडलबीजेपी
मोहन‍ियानिरंजन रामबीजेपी
मध्‍य प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल
जागाउमेदवारपार्टी
बहोरीबंदसंजय पाठकबीजेपी
अगरगोपाल परमारबीजेपी
कर्नाटक पोटनिवडणुकीचे निकाल
सीटउमेदवारपार्टी
चिकोडी-साडलगागणेश प्रकाश हुक्‍केरीकांग्रेस
बेल्‍लारीओबेलेशकांग्रेस
शिकारीपुरराघवेंद्रबीजेपी
पंजाबच्या पोटनिवडणुकीचे निकाल
सीटउमेदवारपार्टी
पटियालापरिनीत कौरकांग्रेस
तलवंडी साबूजीत मोहिंदर सिंहशिरोमण‍ि अकाली दल
पुढील स्लाईडवर बघा, पोटनिवडणुकींसाठी होता कडेकोट बंदोबस्त...उमेदवारांचा जल्लोष...