आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar NCP News In Marathi, Sharad Pawar, Narendra Modi

मोदींची प्रशंसा केल्याने शरद पवारांनी बिहार राष्ट्रवादीचे युनिटच केले बरखास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या बिहारमधील आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बिहार युनिटचे अध्यक्ष नागमणी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याने शरद पवार यांनी बिहार युनिटची मान्यताच रद्द केली आहे.
लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यांनी भाजपसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अगदी काही दिवसांतच नागमणी यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यामुळे संतापलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे बिहार युनिट बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेससोबत जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोदींची प्रशंसा केली होती. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी एक आणि कनिष्ठांसाठी एक असे वेगवेगळे कायदे राष्ट्रवादीत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत नितिशकुमारांच्या पक्षात आश्रय घेतला होता. त्यानंतर चिडलेल्या लालू प्रसाद यादव यांनी पाच बंडखोर आमदारांसह विधानसभेवर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. आता राष्ट्रवादीचे युनिट बरखास्त झाल्याने बिहारमधील राजकारणाला आणखी एक वळण मिळण्याची शक्यता आहे.