आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात आरपार घुसला विळा, दोन तासांच्‍या अवघड शस्‍त्रक्रिकेनंतर वाचले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीतीशकुमारच्‍या गळ्यात असा आरपार विळा घुसला होता. - Divya Marathi
नीतीशकुमारच्‍या गळ्यात असा आरपार विळा घुसला होता.
बेगूसराय (बिहार) - येथील बेगूसराय जिल्‍ह्यामधील सोनमा गावात झाडाची फांदी तोडत असताना एका युवकाच्‍या गळ्यात धारधार विळा घुसला. ही घटना गुरुवारी घडली. बेगूसराय येथील डॉक्‍टरांनी 2 तासांची अवघड शस्‍त्रक्रिया करून त्‍या युवकाचे प्राण वाचवले.
नेमका कसा घुसला होता विळा...
सोनमा येथील नितीशकुमार हा झाडाची फांदी तोडण्‍यासाठी वर चढला. पण, फांदी तोडत असताना तो खाली पडला. दरम्‍यान, खाली एक विळा होता. तो त्‍याच्‍या गळ्यात आरपार घुसला.
नितीशची अवस्‍था पाहून डॉक्‍टरही हादरले
गळ्यात विळा घुसताच नितीशच्‍या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्‍त वाहत होते. त्‍याच्‍या नातलगांनी त्‍याला तत्‍काळ एका खासगी रुग्‍णालयात भरती केले. डॉ. संजय कुमार यांनी त्‍याच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय घेतला. पण, त्‍यावेळी आपल्‍याला भीती वाटली होती, अशी कबुली डॉक्‍टरांनी दिली.
नितीश अजूनही धोक्‍याबाहेर नाही
डॉ. संजय यांनी म्‍हटले, नितीशच्‍या गळ्यातून आम्‍ही विळा काढला आहे. पण, अजूनही त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यामुळे अतिदक्षता विभागात त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा नीतीशचे फोटोज...