आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांझी यांच्याविरोधात डिनर डिप्लोमसीला ऊत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या २० रोजी सादर होणाऱ्या विश्वासदर्शक प्रस्तावावेळी आमदारांनी पक्षाच्या धोरणाशी एकनिष्ठ राहावे यासाठी जदयू, भाजप आणि राजदने डिनर डिप्लोमसी सुरू केली आहे. पक्षाची एकजूट दाखवण्यासाठी आमदारांना एकत्र भोजन दिले जात असल्याचे एका वरिष्ठ जदयू नेत्याने सांगितले.

जदयूचे विधान परिषद सदस्य विनोद सिंग यांनी माजी मंत्री गौतम सिंग यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी आमदारांना मेजवानी दिली. दोघे जण नितीश कुमार यांचे समर्थक मानले जातात. नितीश आणि अन्य आमदारांशिवाय राजद, काँग्रेस आणि सीपीआयच्या नेत्यांनी डिनरचे आयोजन केले होते. या सर्व पक्षांनी नितीश यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले आहे.राजदचे विधीमंडळ गटनेते अब्दुल बारी सिद्दिकी यांनी दिलेल्या भोजनात जदयू, काँग्रेस आणि सीपीआयचे आमदार हजर होते.

आसन व्यवस्थेचा निर्णय अध्यक्षांकडे राहणार
विश्वासदर्शक प्रस्तावावेळी जदयू की भाजप विरोधात बसणार याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत होऊ शकला नाही. अखेर राज्यपाल उदय नारायण चौधरी यांनीच याबाबत निर्णय घेण्याचे ठरवले. दरम्यान, भाजपने या बैठकीवर बहिष्कार टाकला. जदयूचे विधानसभेतील नेते विजय चौधरी यांनी आपल्या पक्षाला विरोधी पक्षाची व स्वत:ला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. पक्षाने मांझी यांच्याविरुद्ध मतदान करण्याचे ठरवले असल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची परवानगी दिली पाहिजे, असे चौधरी यांनी सांगितले.