आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Construction Labor Lift Home By Many Jacks In Bihar

जॅकच्या मदतीने घर उचलतो आठवी पास मजूर, बघायला येतात इंजिनिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- कोणतेही हायटेक तंत्रज्ञान नाही, की कोणत्याही तंत्रज्ञानाची माहिती नाही तरीही एका मजूर बघता बघता घर अगदी अलगद उचलतो. त्याच्या या क्षमतेवर प्रथम विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे हा मजूर केवळ आठवी पास आहे. तरीही 25 लोकांच्या टीमसोबत तो अख्खे घर उचलतो. त्याचा हा कारनामा बघण्यासाठी इंजिनिअरही येतात. त्याच्या पद्धतीची माहिती करुन घेतात. पंजाब आणि हरियाणा येथून त्याने ही कला अवगत केली आहे.
80 इमारतींना उचलले आहे
बिहार सहरसा येथील फूलचंद्र गुप्ता आणि झारखंड चतरा येथील शिबू भारती 25 जणांच्या टीमसोबत काम करतात. यातील फूलचंद हे बांधकाम मजूर असून केवळ आठवी पास आहेत. या दोघांनी 2007 मध्ये पहिल्यांदा एक मजली इमारतीला अशा पद्धतीने उचलले होते. 2010 मध्ये दोघांनी बिहारमध्ये या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी 80 इमारती अशा पद्धतीने वर उचलल्या आहेत.
एक मजली इमारत उचलायला सव्वा लाख, दोन मजली घर उचलायला 2.5 लाख, तीन मजली घर उचलायला 3.75 लाख आणि चार मजली घर उचलायला 5 लाख रुपये खर्च येतो. यासाठी सुमारे 25 ते 35 दिवसांचा कालावधी लागतो.
पुढील स्लाईडवर बघा, जॅकच्या मदतीने कशी उचलली जातात घरे.....