आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News Bihar Punishment Talk Guy Shaved Head Rotated City

मुलासोबत बोलण्‍याची शिक्षा, विद्यार्थीनीचे मुंडन करून गावात फिरविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच महिला दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवसानंतर तिस-याच दिवशी बिहारमधील पुर्णिया या शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सहावीच्‍या वर्गात शिकणारी मुलगी मुलासोबत बोलल्‍यामुळे तिचे मुडंन करून तोंडाला काळे फासण्‍यात आले. महिलांच्‍या स्‍वातंत्र्याची पायमल्ली करणा-या पुरुषी मानसिकता एवढ्यावरच थांबली नाही तर त्‍यांनी तिला आपमानीत करून शहरभर फिरवले. ही विदारक व मनाला हेलावून सोडणारी घटना पुर्णिया शहरातील गुलाबबाग मंडीजवळ असलेल्‍या कदवा टोळी परिसरात घडली.
तिच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या व शेजारी राहणा-या मुलासोबत बोलल्‍याची शिक्षा मुलीला देण्‍यात आली. या मुलीला आई-वडील नसल्‍यामुळे ती आजी-आजोबासोबत कदवा टोळी परिसरात राहते. शेजारी राहणा-या वर्गातील मुलासोबत बोलत असताना परिसरातील लोकांनी तिला पाहिले. या बोलण्‍याची चर्चा वा-यासारखी सगळीकडे पसरली. पसिरातील लोकांनी बैठक घेऊन या मुलीला 12 हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्‍यामुळे तिला रात्रभर घरात कोंडून ठेवण्‍यात आले. दुस-या दिवशी मुंडन करून तिला अपमानीत करण्यात आले. त्यानंतर शहरभर फिरवले.
पुढील स्लाईडवर वाचा परिसरातील आरोपी संदर्भात...