आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेडीयूचा काँग्रेसला ठेंगा, दिल्लीत "आप'ला पाठिंबा, प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ सिंह यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसकडे झुकलेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र या पक्षाला ठेंगा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या बाजूने जाण्याऐवजी "आप'ला पाठिंबा देणे पसंत केले आहे.

जेडीयूचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विरोध डावलून आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी "आप'च्या पाठिंब्याची घोषणा केली. पाटण्यात नितीशकुमार यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्यासाठी वसिष्ठ आले होते. या वेळी पाठिंब्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, जेडीयू-काँग्रेस युती केवळ बिहारपुरती मर्यादित आहे. राज्याबाहेर अन्य पर्याय शोधण्याचा मार्ग मोकळा आहे. दरम्यान, जेडीयूचे सरचिटणीस के.सी.त्यागी यांनी पाठिंब्याचा प्रस्ताव आहे, मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यागी म्हणाले, समाजवादी पार्टी आणि राजदने दिल्लीत आपापले उमेदवार उभे केले आहेत आणि अशा स्थितीत जेडीयूने "आप'साठी प्रचार करणे योग्य ठरणार नाही. "आप'ला पाठिंबा देण्याचा निर्णय रोखून धरला आहे.
काँग्रेसचे चिंतन शिबिर
या वर्षअखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या चिंतन शिबिराला मंगळवारी प्रारंभ झाला. शिबिर ४ दिवस चालेल. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी सी. पी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे.
"आप'ला पाठिंबा नको
नितीश कुमार आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यातील जवळीकतेवर काँग्रेसने जेडीयूला इशारा दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेडीयू आम आदमी पार्टीला पाठिंबा देत असेल तर त्यांना बिहारमध्ये परिणाम भाेगावे लागतील, या शब्दात त्यांना सुनावले आहे. बिहारमध्ये जेडीयू सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरले आहे. नितीश यांनी आपच्या पाठिंब्याचे सूतोवाच केल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडली. िनतीश कुमार व केजरीवाल यांच्यात खिचडी शिजत असल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते प्रेमचंद मिश्रा यांनी जारी केलेल्या पत्रकात बिहारमधील मांझी सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ताारूढ असल्याची आठवण करून देण्यात आली आहे. ‘आप’ला पाठिंबा दिल्यास मांझी सरकारचे भवितव्य धोकादायक ठरेल. नितीश मुरब्बी नेते असल्यामुळे ते काँग्रेस पक्षाच्या भावनांचा आदर करतील, अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली आहे.