आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Wifi Zone In Patna Is The World Biggest Wifi Zone

भारतात आहे जगातील सर्वात मोठे WiFi Zone, मोफत दिली जाते इंटरनेट सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार राज्‍य म्‍हटले की भ्रष्‍टाचार आणि गुन्‍हेगारी आपल्‍या डोळ्यासमोर येते. गुन्‍हेगारीमुळे बदनाम झालेल्‍या राज्‍यात चांगले काही असेल का ? असा प्रश्‍न तुम्‍हाला नक्कीच पडला असेल. याशिवाय या राज्‍याबद्दल अनेक प्रश्‍न तुमच्‍या डोक्‍यात असतील. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे बिहारच्‍या स्‍थापना दिवसानिमित्त आम्‍ही तुम्‍हाला देणार आहोत. 22 मार्च हा बिहारचा स्‍थापना दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून आम्‍ही बिहार राज्‍याबद्दल असलेले गैरसमज दुर करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहोत.
माहिती तंत्रज्ञाच्‍या स्‍पर्धेत हे राज्‍य तुसभरही मागे नाही याची प्रचिती तुम्‍हाला बिहारला गेल्‍यांनतर नक्कीच येईल. बिहारमध्‍ये जगातील सर्वात मोठे WiFi Zone असून या झोनमध्‍ये इंटरनेट सेवा मोफत पुरवण्‍यात येते. या झोनची स्‍थापना बिहारची राजधानी पटनामध्‍ये करण्‍यता आली आहे.
चीनलाही केले ओव्‍हर टेक -
पटनामध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जगातिल सर्वात मोठ्या वाय-फाय झोनचा कवरेज एरिया 20 किलोमिटरचा आहे. अशा प्रकारचे कवरेज एरिया असलेले वाय-फाय झोन याआगोदर फक्‍त चीनमध्‍ये होते. चीनच्‍या वाय-फाय झोनची मर्यादा होती 3.5 किलोमिटर.
अशोक राजपथ ते दानापूरपर्यंत मोफत इंटरनेट-
अशोक राजपथ ते दानापूरपर्यंत पटाना शहरात इंटरनेट कनेक्‍शन नसले तरी नेट सुवीधा उपलब्‍ध होते. अशा प्रकारचे इंटरनेट झोन बिहारमध्‍ये असायला हवे ही कल्‍पना मुख्‍यमंत्री नीतिश कुमार यांनी मांडली आणि ती वास्‍तवात आणल्‍यामुळे आज या झोनची जगभर चर्चा केली जात आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा जगातील सर्वात मोठ्या WiFi Zoneची छायाचित्रे...