आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report On Riots In Two Community After Love Affair In Bihar

जाणून घ्या, प्रेमावरुन कशी भडकली होती बिहारमध्ये दंगल, घेतले 4 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- मुजफ्फरपूर येथील सरैया प्रखंडमधील अजीजपूर बलिहारा गावात प्रेमावरुन रविवारी प्रचंड दंगल उसळली. दोन समुदाय घातक शस्त्रे घेऊन एकमेकांसमोर आले. यावेळी एका समुदायाच्या लोकांनी दुसऱ्या समुदायाच्या संपूर्ण वस्तीचीच राखरांगोळी केली. यात चार लोकांचा मृत्यू झाला. आताही या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वस्तीला आग लावण्यापूर्वी उपद्रवी लोकांनी महिलांचा विनयभंग केला आणि लुटालुट केली. अब्रू वाचवण्यासाठी काही महिलांनी जंगलात आश्रय घेतला. त्यांच्यामध्ये एवढी दहशत पसरली आहे, की त्या आताही घरी परतण्यास तयार नाहीत.
सानिया परवीन आणि भारतेंदू यांच्या प्रेमप्रकरणामुळे दंगल भडकल्याचे सांगितले जाते. आठवीत असतानाच दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. यासंदर्भात दोन्ही समाजांमध्ये पंचायती झाल्या. परंतु, दोघांनी पंचायतीचा निर्णय मानण्यास नकार दिला. यानंतर दोघांच्या कुटुंबीयांमध्ये संघर्ष सुरु झाला. भारतेंदूचे अपहरण आणि त्यानंतर हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका पोत्यात सापडला.
भारतेंदूची बहिण नीलम हिने सांगितले, की सानिया परवीन, भारतेंदू आणि सानियाचा भाऊ विक्की लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होते. तिघेही चांगले मित्र होते. दोघांमध्ये कधी प्रेम झाले समजले नाही. पण आठव्या वर्गानंतर दोघे शेतात भेटायचे. बाहेर एकत्र दिसायचे. याबाबत सानियाला विचारले तर ती विषय टाळायची. पण नंतर माझे लग्न झाल्यावर तीने अनेकदा भारतेंदूसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.
सानिया आणि भारतेंदूच्या मैत्रीला विक्कीचा पूर्वी विरोध नव्हता. पण दहावीच्या परिक्षेत केवळ भारतेंदू पास झाला. तेव्हापासून तो त्याचा राग करीत होता. त्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले होते. सहा महिन्यांपूर्वी त्याने सानिया आणि भारतेंदू यांना एकत्र बघितले होते. यावेळी विक्की आणि भारतेंदू यांच्यात मारहाण झाली होती. विक्कीने भारतेंदूला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये अनेक पंचायती झाल्या. परंतु, त्यावेळी कोणताही निष्कर्ष निघाला नाही. त्यानंतरही दोघांचे भेटणे सुरुच होते.
नवीन वर्षाच्या सुरवातील विक्कीने भारतेंदू याच्याशी पुन्हा मैत्री केली. 8 जानेवारी रोजी विक्कीने भारतेंदूला भेटायला बोलवले होते. आपण सौदी अरबला जाऊ, असे सांगितले होते. परंतु, भारतेंदू यासाठी तयार नव्हता. विक्कीने पुन्हा 9 जानेवारी रोजी त्याला बोलविले. त्यानंतर रविवारी भारतेंदूचे प्रेत मिळाले. याची बातमी पसरल्यावर परिसरात दंगल उसळली.
पुढील स्लाईडवर बघा, प्रेमप्रकरणामुळे उसळलेली दंगल... या हिंसाचारात गेले चार जीव...