आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्‍या गुंडगिरीला मराठी \'सिंघम\'चा चाप, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिका-यांच्‍या बदल्‍या केल्‍या आसल्‍या तरी शिवदीप लांडे यांची मात्र पटना शहरात एसपी पदावर नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पटनातील नागरिकांचा लांडे यांच्‍या कार्याला सलाम असतो. पटना शहरात लांडे यांची सिंघम, दबंग आणि रॉकस्‍टार म्‍हणून ओळख निर्माण झाली आहे.
विदर्भाचा मराठी माणूस-
34 वर्षे वय असेलेले शिवदीप लांडे यांचा जन्‍म विदर्भातील अकोला जिल्‍ह्यात झाला. गावकडे त्‍यांची सात एकर कोरडवाहू शेती आहे. आई-वडील सातवीपर्यंत शिकलेले. प्रतिकुल परिस्थिती शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी म्‍हणून 2006 मध्‍ये त्‍यांची निवड झाली.

बिहारमध्‍ये आयपीएस अधिकारी म्‍हणून निवड झालेल्‍या लांडे यांची बिहार राज्‍यामध्‍ये वारंवार चर्चा होत असते. पटनातील गुंडगिरीला चाप लावण्‍यासाठी मुख्‍यमंत्री नीतीश कुमार यांनी शिवदीप लांडे यांना 'एसपी' पदाची जबाबदारी दिली होती. लांडे यांची काम करण्‍याची पद्धत आणि गुन्‍हेगारी जगतावर असलेला वचक यामुळे आज पटना शहरातील नागरिक बिनधास्‍त जगत आहेत. त्‍यांना गुंडापासून होणार त्रास बंद झाला आहे. कॉलेजमध्‍ये जाणारे तरूण-तरूणी यांचे ऑयकॉन म्‍हणून बिहारमध्‍ये शिवदीप लांडे यांना ओळखले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा मराठी सिंघमची कारवाई करतानाची फोटो...