आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानजींना मिळाली नोटीस, 4.33 लाख कर भरला नाही तर होतील डिफॉल्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- आरा महानगरपालिकेने येथील श्री हनुमानाला कर भरण्‍याची सूचना केली आहे. एवढेच नाही तर चक्‍क त्‍यासंदर्भातील नोटीसही पाठवली आहे. जर हनुमानजींनी टॅक्‍स भरला नाही, तर महापालिका शहरात 6 ठिकाणी हनुमानजींचे हॉर्डिग्‍स लावून त्‍यांना डिफॉल्टर घोषित करणार आहे. हनुमानजींना 4.33 रुपये कर देण्‍याचे मनपाने सांगितले आहे.
- नोटिसनुसार हनुमानजींना मनपामध्‍ये 4.33 लाख रुपये एवढा कर भरावा लागणार आहे.
- आरामधील बडी मठिया येथील मंदिरात श्री हनुमानाच्‍या नावाचे तीन होर्डिंग्‍स आहेत.
- कर जमा करण्‍यासंदर्भात मनपाने आधी दोन वेळा इन्फॉर्म केले आहे.
- मात्र हनुमानजींकडून कराचा भरणा झाला नाही.
असे बनले हनुमानजी टॅक्स होल्डर....
- महापालिकेच्‍या यादीत मठिया हनुमानजींचे नाव आहे.
- मठिया हनुमानजींचे मंदिर वार्ड नंबर-37 मध्‍ये आहे.
- याच मंदिरात श्री हनुमानाच्‍या नावाने तीन बॅनर लागले आहे.
- 587 क्रमांच्‍या बॅनरवर 3.17 लाख रुपये, 607 क्रमांकाच्‍या बॅनरवर 94 हजार रुपये आणि होर्डिंग क्रमांक 624 वर 22 हजार रुपये कराचा उल्‍लेख केला आहे.
काय आहे नियम....
- महापालिका गृहनिर्माण व विकास विभागाच्‍या नियमानुसार, ज्‍या नावाचे बॅनर आहे. कर त्‍याच नावाने वसूल केला जातो.
- मठिया हनुमानजीसोबतही हाच नियम लागू झाला.
- कारण रजिस्‍टरमध्‍ये मंदिर व्‍यवस्‍थापनातील कोण्याची सदस्‍याचे नाव नाही.
- महापालिका आयुक्‍त प्रमोद कुमार यांचे म्‍हणने आहे की, टॅक्स होल्डरच्‍या नावाने नोटीस पाठवण्‍याची तरतूद आहे.

हनुमानजींना आधीही पाठवली आहे नोटीस....
- या आधीही फेब्रुवारी महिन्‍यात बेगूसराय जिल्‍ह्यात एका मंडळ अधिका-याने श्री. हनुमानजींना नोटीस पाठवली होती;
- नोटिसमध्‍ये लिहीले होते की, आपल्‍या मंदिरामुळे रहदारीला त्रास होतो. आपण आपले मंदिर हटवावे.
भगवान राम विरोधात दाखल झाला होता गुन्‍हा....
- जानेवारी 2016 मध्‍ये सीतामढीच्‍या एका वकीलाने भगवान रामाविरोधात गुन्‍हा दाखल केला होता.
- न्‍यायालयासमोर बोलताना या वकीलाने असा तर्क लावला होता की, माता सीतेचा कोणताही दोष नसताना भगवान श्रीरामाने त्‍यांना जंगलात का पाठवले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटो....