आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार पहिल्‍यांदा बनले JDU अध्‍यक्ष, सुरूवातीला का दिला होता नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- नितीशकुमार पहिल्‍यांदा जदयूचे (जनता दल यूनायटेड) अध्‍यक्ष बनले आहेत. रविवारी दिल्‍लीमध्‍ये झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. मिळालेल्‍या माहितीनुसार सुरूवातीला नितीश यांनी पक्षाची धूरा सांभाळण्‍यास नकार दिला होता. बिहारमध्‍ये मुख्‍यमंत्री असल्‍याने अध्‍यक्षपद सांभाळणे आपल्‍यासाठी योग्‍य नाही, तसे नितीश यांचे म्‍हणने होते. वशिष्ठ नारायण सिंह आणि के.सी. त्यागी यांची नावेही आघाडीवर होते. मात्र, अखेर अध्‍यक्षपदाची माळ नितीश यांच्‍याच गळ्यात पडली.
शरद यांनी ठेवला नितीशकुमारांच्‍या नावाचा प्रस्‍ताव..
जदयूचे नवीन राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीशकुमार यांच्‍या नावाचा प्रस्‍ताव शरद यादव यांनी ठेवला होता. जदयू नेते के. सी. त्यागी यांनीही त्‍यांच्‍या नावाला अनुमोदन केले होते. त्‍यानंतर कार्यकारिणीच्‍या सदस्‍यांनी नितीश यांच्‍या नावाला पसंती दिली.
नितीश यांना का बनायचे नव्‍हते अध्‍यक्ष..
- नितीश मुख्‍यमंत्र्यांबरोबर पक्षाध्‍यक्षाची जबाबदारी घेऊ इच्‍छित नव्‍हते.
- यामुळे जनतेत पक्षाची प्रतिमा वाईट होऊ शकते, असे त्‍यांचे मत होते.
- लोकांमध्‍ये चुकीचा संदेश जाऊ नये म्‍हणून त्‍यांचा अध्‍यक्षपदाला नकार होता.
- अध्‍यक्षपद घेतल्‍यास पक्षाची प्रतिमा वन-मॅन-पार्टी होऊ शकते, असे नितीश यांना वाटत होते.
काय म्‍हणाले त्‍यागी..
- नितीश पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. मात्र त्‍यांच्‍यात पीएम बनण्‍याची पात्रता आहे.
- आमचा पहिला उद्देश भाजपाला रोखणे आहे.
पुढे पाहा संबंधित फोटो..