आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांझी म्हणाले- कमी जागा मिळाल्या तर भाजपला रामराम, शत्रुघ्न यांनी दिला घरचा आहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारच्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी आणि खासदार पप्पू यादव यांच्यात जवळीक वाढली आहे. दोघांनी अप्रत्यक्ष युती केली असून कमी जागा मिळाल्या तर भाजपला रामराम ठोकले जाईल, असे सांगत आहेत. मांझी आणि यादव यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे, भाजपचे वरिष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपने सावध राहायला हवे असे बजावत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊ नका, असे बजावले आहे.
हे म्हणाले मांझी
मांझी म्हणाले, की आम्ही आत्मसन्मान जपणारे आहोत. पण जर आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही तर रस्ते वेगवेगळे राहतील. पप्पू यादव यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आता आमच्या पक्षांमध्ये आघाडी होईल की केवळ पाठिंबा दिला जाईल यावर 20 जुलै रोजी निर्णय घेतला जाईल.
पप्पू यादव म्हणाले, मांझींना सीएमपदाचा उमेदवार करा
पप्पू म्हणाले, की एनडीएने जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करायला हवे. एनडीए नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करु शकते तर जीतनराम मांझी यांनाही संधी द्यायला हवी. मांझी यांनी सामाजिक ऐक्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा मांझी यांना पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
पुढील स्लाईडवर वाचा, काय म्हणाले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा...