आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू यादव यांचे फेसबुक अकाउंट हॅक, राष्‍ट्रीय नेत्‍यांबाबत केल्‍या अश्‍लिल पोस्‍ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे फेसबुक अकाउंट सायबर गुन्‍हेगारांनी हॅक केले आहे. हॅक करणा-यांनी काही राष्‍ट्रीय नेत्‍यांबाबत वादग्रस्‍त आणि अश्‍लिल मजकूर या अकाउंटवर पोस्‍ट केल्‍याची माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच लालूंचे पुत्र आणि उपमुख्‍यमंत्री तेजस्‍वी यादव यांनी सचिवालय पोलिस ठाण्‍यात एफआयआर दाखल केला. पाटणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांचा दावा..
- पोलिसांचा दावा आहे की, अकाउंट हॅक करणा-यांना तत्‍काळ पकडण्‍यात येईल.
-याआधीही काही हॅकर्सनी कित्‍येक मंत्री आणि अधिका-यांचे अकाउंट हॅक केले आहे.
- काही दिवसांपूर्वी मंत्री ललन सिंह यांचे फेक फेसबुक अकाउंट तयार करणा-यांना अटक करण्‍यात आले आहे.