आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंंनी बेडरूममध्‍ये कापला केक, रात्री 12 वाजता राबडींंनी दिला गुलाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राजदचे अध्‍यक्ष लालू प्रसाद यादव आज 69 वा जन्मदिवस साजरा करत आहेत. शुक्रवारी रात्री पासूनच त्‍यांच्‍या घरी जल्‍लोष सुरू आहे; रात्री 12 वाजता लालू यांनी पत्नी राबडी देवी आणि मुलीसोबत बेडरुमध्‍ये केक कापला. राबडी यांनी गुलाब फुलांचा गुच्‍छ देऊन लालू यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. लालू राबडींना म्‍हणाले, रस काढून मिठाई भरव..
- वाढदिवसानिमित्‍त लालू यांच्‍या घरी रसगुल्ल्यांची मेजवाणी होती.
- दरम्‍यान पत्‍नी राबडी यांनी लालुंना भरवण्‍यासाठी एक मिठाई उचलली.
- तेव्‍हा लालू म्‍हणाले की, रसगुल्‍ल्‍यातील रस काढून भरव.
कार्यकर्त्‍यांनी केली गर्दी..
शनिवारी लालूंना भेटण्‍यासाठी कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या घरी गर्दी केली होती. मिठाई खा. तोंड गोड करा आणि आपआपल्‍या घरीही मिठाई घेऊन जा, असे सांगत सायंकाळच्‍या कार्यक्रमासाठी उपस्‍थित राहण्‍याचे आवाहन लालू यांनी कार्यकर्त्‍यांना केले आहे. सायंकाळी सांस्‍कृतिक कार्यक्रम आणि भोजनाचा कार्यक्रम आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, लालू यांच्‍या वाढदिवसाचे काही खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...