आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: चहा घेताना लालूंच्‍या अंगावर फॅन पडला, वाचा कसे भडकले लालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोतिहारी- बिहारच्‍या चौथ्‍या टप्प्यातील निवडणूकीच्‍या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. दरम्‍यान मोतिहारी विधानसभेच्‍या लखौरामध्‍ये आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची सभा सुरू होती. सभेतील मंचावर लालू यादव चहा पित होते. तेवढ्यातच अचानक सिलींग फॅन त्‍यांच्‍या हातावर पडला. त्‍यामुळे चहा पित असलेल्‍या लालुंचे हात जळाले. नंतर लालूंचा पारा चांगलाच भडकला त्‍यांनी साऊड संचालकाला खडे बोल सुनावले.
या घटनेतून लालू थोडक्‍यात बचावले अन्‍यथा त्‍यांना गंभीर दुखापत झाली असती. फॅन त्‍यांच्‍या हातावर पडल्‍यानंतर मंचावर चांगलाच गोधळ उडाला होता. लालूंनी व्‍यासपीठ देखरेख करणा-यांबरोबर पोलिसांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. या घटनेनंतर त्‍यांनी सभेला संबोधित केले.
गळ्यातील लॉकेट काढून लालू म्‍हणाले..
या घटनेनंतर लालू यादव यांनी गळ्यातील दुर्गा मातेचे लॉकेट काढले नि उपस्‍थितांना दाखवत ते म्‍हणाले की, ज्‍यांच्‍यावर कृपादृष्‍टी असते त्‍यांचे कोणी काहीच बिघडवू शकत नाही. त्‍यांच्‍या या विधानाला उपस्‍थितांनी टाळ्यांची साथ दिली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कसा पडला लालूंच्‍या हातावर पंखा..