आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Patna Blast Narendra Modi Hunkar Rally Indian Mujahideen

पाटणा बॉम्बस्फोटांचे हे आहेत मास्टरमाईंड; तहसीन अख्तर, वकास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत झालेल्या आठ बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीनचे (आयएम) दहशतवादी तहसीन अख्तर आणि वकास असल्याचे उघडकीस आले आहे. बिहारच्या समस्तीपूर येथील 30 वर्षीय तहसीन आणि पाकिस्तानी नागरिक वकास "आयएम"च्या फरारी दहशतवाद्यांपैकी एक आहे. वकास याचे बिहारमधील एका राजकीय कुटुंबासोबत संबंध असल्याचे सांगितले जाते. वकासचे काका तकी अख्तर समस्तीपूर जनता दल (युनायटेड) या पक्षाचे सक्रीय नेते आहेत.
तहसीनवर आहे 10 लाखांचे बक्षिस
तहसीनकडे बिहार आणि झारखंड येथील दहशतवादी घडामोडींची जबाबदारी आहे. त्याच्यावर पोलिसांनी 10 लाखांचे बक्षिस लावले आहे. 2006 मध्ये झालेला वाराणसी बॉम्बस्फोट, 2011 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि 2013 मध्ये हैदराबादमधील दिलसुखनगर येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत त्याचा सहभाग होता. नरेंद्र मोदी यांची रॅली आणि रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात तहसीनचा हात होता, असे सांगितले जात आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीनुसार (एनआयए) तहसीन बहुरुपी आहे. त्याला वेगवेगळ्पया पर्य़टन स्थळांवर बघण्यात आले आहे. गाईड होऊन रेकी करण्यात तो माहिर आहे. तो इंटरनेट कॅफेत बराच वेळ घालवितो. बनावट कागदपत्रे देऊन सिमकार्ड मिळविण्यातही तो हुशार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा कोण आहे वकार...