आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारः नितीश CM झाल्‍यावर हा समर्थक कापतो बोट, बाबाला करतो अर्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहानाबाद (बिहार) - याला वेडसरपणा म्‍हणावा की, प्रेम.. ? नितीश कुमार पुन्‍हा मुख्‍यमंत्री झाल्‍यानंतर जहानाबाद येथील त्‍यांच्‍या एका भक्‍ताचे आपले बोट कापून गोरैया बाबाला अर्पण केले आहे. अनिल शर्मा उर्फ अली बाबा असे या 45 वर्षीय व्‍यक्‍तीचे नाव आहे. बिहारमध्‍ये नितीश कुमार सरकार आल्‍यानंतर आनंदाच्‍या भरात या समर्थकाने बोट कापले आहे.
आधीही कापले होते बोट
या संदर्भात अशीही माहिती मिळाली की, अनिलने पहिल्‍यांदाच त्‍याचे बोट कापले नाही. 2005 आणि 2010 मध्‍ये जेव्‍हा नितीश कुमार मुख्‍यमंत्री झाले होते. तेव्‍हाही अनिलने हाताचे बोट कापले होते. बोट कापल्‍यानंतर तो एका बाबाला ते अर्पण करतो. आपले नवस पूर्ण करण्यासाठी तो आपल्या बोटांची आहुती देतो. बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नितीशकुमार यांनाच बसलेले पाहण्याची अनिलची इच्छा असते.
नितीश कुमार मुख्‍यमंत्री बनले नसते तर आत्‍महत्‍या केली असती
जहानाबाद जिल्ह्यात घोसी पोलीस स्‍टेशनअंतर्गत येणा-या वैना गावात अनिल शर्मा उर्फ़ अली बाबा राहतो. नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अनिलने आपले आणखी एक बोट कापले. अनिल यांनी असा नवस केला होता की, यावेळी नितीश कुमार जर मुख्यमंत्री बनले नाहीत तर ते आत्महत्या करतील.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अनिलने आधीही कापले होते बोट, असे का करतो हा समर्थक..