आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्र मंथनासाठी केला होता या पर्वताचा वापर, जाणून घ्‍या पुराण कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रत्‍येक राज्‍याला इतिहास असतो. असाच काहीसा वेगळा इतिहास बिहार राज्‍याला आहे. पुराण कथेतील दाखले असो किंवा सम्राट अशोकचा इतिहास अशा विविध परंपरांचे ऐतिहासीक वैभव भारतीय संस्‍कृतीमध्‍ये पाहायला मिळते. या ऐतिहासीक वास्‍तू आजही देशाच्‍या सौंदर्यात भर टाकत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला समुद्र मंथनासाठी वापरण्‍यात आलेल्‍या बिहारमधील 'मदार पर्वता' विषयी माहिती देणार आहोत.
भागलपूरपासून 45 किलोमिटर अंतरावर बांका जिल्‍ह्यात 'मंदार पर्वत' दिमाखात उभा आहे. 700 फुट उंच असलेल्‍या या पर्वताचा 'महाभारत' आणि पुराण कथेत उल्लेख झाल्‍याचे दाखले मिळतात. अमृत प्राप्‍त करण्‍यासाठी देवी-देवताने समुद्र मंथनासाठी 'मदार पर्वता'चा वापर केला होता. या मंथनात 'हलाहल' विष आणि 14 रत्‍नाची निर्मिती झाली.

मंदार पर्वतावरील पापहरणी तलाव-
मंदार पर्वतावरील तलावाला पापहरणी तलाव म्‍हणून ओळखले जाते. या पर्वतावर कर्नाटकातील कुष्‍ठपीडित चोलवंशाच्‍या राजाने मकर संक्रांतीच्‍या दिवसी स्‍नान करून रोगापासून मुक्‍ती मिळवली होती. तेव्‍हापासून या तलावाला पापहरणी तलाव म्‍हणून ओळखले जाते. या आगोदर तलावला 'मनोहर कुंड' नावाने ओळखले जात होते.
लक्ष्‍मी -विष्‍णु मंदिर-
पापहरणी तलावाच्‍या मधोमध लक्ष्‍मी-विष्‍णुचे एक मंदिर आहे. मकर संक्रांतीला या पर्वतावर यात्रेचे आयोजन करण्‍यात येते. या यात्रेसाठी देशभरातून विष्‍णू भक्‍त येत असतात.
प्रत्‍येकवर्षी भरते यात्रा-
विष्‍णूने राक्षस मधुकैटभचा वध या पर्वतावर केला होता. प्रत्‍येक वर्षी मकर संक्रांतीला मधुकैटभला दर्शन देण्‍यासाठी या पर्वतावर भगवान विष्‍णू येतात. अशा प्रकारची अख्‍यायिका सांगितली जाते. या यात्रेमध्‍ये लाखो भाविक सहभागी होताता.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'मंदार पर्वता' ची छायाचित्रे...